आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय पुन्हा क्वारन्टाईन

Foto
 प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय आज (दि.21 ) पुन्हा एकदा क्वारन्टाईन झाले आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला असून अहवालाची प्रतिक्षा कायम आहे. 
याआधी देखील त्यांच्या घरी काम करणार्‍या कुकला कोरोनाची लागण झाल्याने आयुक्त पत्नी मोक्षदा पाटील व परिवारासहित यांच्या समवेत होम क्वारन्टाईन झाले होते. आस्तिक कुमार पाण्डेय हे त्यांच्या पत्नी ग्रामीण पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या सिडकोतील शासकीय निवासस्थानीच राहतात.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त सतत फिरस्तीवर होते.दररोज कोविड केअर सेंटरला भेटी देणे, विविध कामांची पाहणी करणे यात ते अ‍ॅक्टिव्ह आहेत.